Vishwas Nangare Patil: महाराष्ट्राचा रिअल सिंघम.. भल्या-भल्यांना लाजवणारा फिटनेस!

मुंबई तक

जेव्हाही सिंघम नाव ओठांवर येतं, त्यावेळी आपसूकच IPS अधिकारी विश्वास नांगरे-पाटील हे आपल्या डोळ्यासमोर येतात.

महाराष्ट्राच्या 'या' रिअल सिंघमचा फिटनेस वयाच्या 49व्या वर्षीही थक्क करणारा आहे.

ज्यावेळी देशातील बेस्ट IPS अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात त्यावेळी नांगरे-पाटलांचीही त्यात गणना होते.

IPS विश्वास नांगरे-पाटलांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अॅडिशनल डिजी पदावर पदोन्नती झालीए.

नांगरे-पाटील हे 1997 बॅचचे अधिकारी आहेत, वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षा पास केली होती.

IPS विश्वास नांगरे त्यांच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत नेहमी जागरूक असतात.

'द रणवीर शो' या कार्यक्रमात नांगरे पाटलांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितलं आहे.

विश्वास नांगरे हे व्यायामाबरोबर योगा, जीममध्ये वर्कआउटही करतात.

ज्यावेळी मुंबईत मॅराथॉन स्पर्धांचे आयोजने केले जाते त्यावेळी उत्साहाने ते त्यात सहभाग घेतात.

नांगरे पाटलांना सायकलिंगचाही छंद आहे. तसेच ते नेहमी त्यांचा डाएटही कटाक्षाने पाळतात.