तुम्ही व्हिस्की थंड पाण्यासोबत घेता? मग तज्ज्ञ म्हणतात ते वाचा

मुंबई तक

मद्य पिताना अनेक जण ते कोल्ड ड्रिंक सोबत घेतात, तर काही जण थंड पाण्यात.

तज्ज्ञांच्या मते व्हिस्कीमध्ये मिसळण्यात येणाऱ्या पाण्याचं तापमान महत्त्वाचं असतं.

माणसाच्या स्वाद ग्रंथी वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या तापमानावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात.

त्यामुळे वेगवेगळ्या तापमानातील पदार्थ आणि द्रव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळी चव लागते.

चांगल्या चवीसाठी जेवण असो वा ड्रिंक गरम असणं आवश्यक आहे. त्यामुळे थंड बिअर चांगली लागते मात्र, गरम बिअर कडू लागते.

तज्ज्ञांच्या मते माणसाच्या स्वाद ग्रंथी 15 ते 35 सेल्सियस तापमानात योग्य पद्धतीने काम करतात. 35 डिग्री तापमानात स्वाद ग्रंथी खुल्या असतात आणि मेंदूपर्यंत चवीचा मेसेज पाठवतात.

तज्ज्ञांच्या मते व्हिस्कीची खरी चव कळण्यासाठी पाण्याचं तापमान रुममधील तापमानप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडं जास्त असावं.