itel चा पहिला टॅबलेट भारतात लॉन्च; किंमत आहे फक्त...

मुंबई तक

Itel ने भारतात आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे. कमी बजेटमध्ये हा टॅबलेट मोठ्या स्क्रीनसह आणि आयपॅड सारखा डिझाइनसह येतो.

Itel भारतात स्मार्टफोन, फीचर फोन आणि इतर उत्पादने विकतो. चायनीज ब्रँडनेही या वर्षाच्या सुरुवातीला आपला टीव्ही लाँच केला होता.

हा टॅबलेट 4G सपोर्टसह येतो. यामध्ये कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये मोठी स्क्रीन, 128GB स्टोरेज आणि 8MP मागील कॅमेरा आहे.

Itel Pad One च्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तुम्ही ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.

नॅनो सिम सपोर्टसह Itel Pad One मध्ये 10.1-इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले आहे, जो 1280x800 पिक्सेल रिझोल्यूशनचा आहे. डिव्हाइस ऑक्टा-कोर SC9863A1 प्रोसेसरसह येतो.

यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. मायक्रो एसी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

यात 8MP चा सिंगल रियर कॅमेरा आहे. समोर 5MP ऑटोफोकस कॅमेरा उपलब्ध आहे. यात 6000mAh बॅटरी दिलेली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.