'मारुतीने निर्णय घेतला की...', जितेंद्र आव्हाडांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे

मुंबई तक

आपला कुठलाही देव बॅचलर नाही, कुठलेही महापुरूष बॅचलर नाही', असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या या विधानाचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मार्मिक पद्धतीने समाचार घेतला.

आव्हाड म्हणाले, 'आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या...'

'...व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं.'

'मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार.'

'संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे.'

'त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत', असा चिमटा आव्हाडांनी काढलाय.