KL Rahul आणि Athiya हनिमूनलाही जाणार नाहीत!

मुंबई तक

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचं 23 जानेवारीला लग्न झालं.

अभिनेता सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात 100 पाहुण्यांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं.

आता लग्नानंतर, अथिया आणि केएल राहुल हनिमूनला कुठे जाणार? ही उत्सुकता सर्वांना होती.

मात्र, अथिया आणि केएल राहुलने त्यांच्या रिसेप्शनसह हनिमूनही कॅन्सल केलं आहे.

राहुल-अथियाने त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंट्समुळे हनिमूनला जाणं कॅन्सल केलं.

केएल राहुलचे शेड्यूल खूपच पॅक आहे. तो भारतीय उपकर्णधार म्हणून फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिका खेळणार आहे.

कसोटी मालिकेनंतर राहुलला आयपीएलमध्ये खेळायचे आहे, ज्यामध्ये तो लखनऊ टीमचा कर्णधार आहे.

तसेच, अथियाने तिचं यूट्यूब चॅनल लाँच केलं आहे, ज्यामध्ये ती व्यस्त असेल.