Grahan 2023: यंदाच्या वर्षी किती आणि कधी आहेत ग्रहणं?

मुंबई तक

2023 या वर्षात चंद्र ग्रहणाच्या 2 आणि सूर्य ग्रहणाच्या 2 अशा एकूण 4 खगोलीय घटना पाहायला मिळणार आहेत.

2023 मधील पहिलं सूर्य ग्रहण 20 एप्रिलला असणार आहे. परंतु, ते ते भारतातून दिसणार नाही.

दुसरं सूर्य ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 ला असेल. हेही भारतातून दिसणार नाही.

चंद्र ग्रहणाच्या बाबतीत, 2023 मधील पहिलं चंद्र ग्रहण 5 मे रोजी आहे.

पहिलं चंद्र ग्रहण रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री एकच्या सुमारास संपेल.

भारतातून हे चंद्र ग्रहण दिसणार नाही. ते आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, प्रशांत महासागर, हिंदी महासागर आणि अंटार्टिकामध्ये दिसेल.

2023 मधील दुसरं चंद्रग्रहण 29 ऑक्टोबरला असेल. पहाटे 1 वाजून 6 मिनिटांनी सुरू होत, पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी संपेल.

दुसरं चंद्रग्रहण भारतात सर्वांना पाहायला मिळेल. तसंच युरोप, आशिया, आफ्रिकेमधूनही हे ग्रहण पाहता येणार आहे.