Side Effects of Egg: दिवसभरात 'एवढीच' अंडी खा, नाहीतर...

मुंबई तक

अंड दररोज खाण्याचे अनेक फायदे आहेत. अंड्यात विशेष प्रकारचे पोषक तत्व असतात.

रोज अंडी खावीत, पण याचं एक प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाणं शरीरास घातक असतं.

शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कॅल्शिअम, अँटी ऑक्सिडंट अंड्यातून मिळतात.

याशिवाय अंड्यातून जीवनसत्त्व B5, जीवनसत्त्वे B12, फॉलेट, फॉस्फरसही मिळतं.

अंड कधी आणि किती खावं याची माहिती नसेल तर यामुळे नुकसानही होऊ शकते.

रोज अंडी खाल्ल्याने शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढते. ज्याचा हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

दररोज एकापेक्षा जास्त अंडी खाल्याने कॅलरी वाढतात. यामुळे लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दिवसभरात 3 अंडी खाता येतात, त्यापेक्षा जास्त अंडी खाऊ नये.

तसंच, जास्त अंड खाल्याने पचनक्रिया बिघडूही शकते. पोटदु:खी, गॅस या समस्याही उद्भवू शकतात.