Bajra Benefits : बाजरी खा अन् आजारांपासून दूर राहा... वाचा फायदे काय?

मुंबई तक

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश फायदेशीर ठरतो.

बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक असतात.

बाजरीतील पोषक घटक शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

बाजरीचे आपण वेगवेगळ्या स्वरूपात सेवन करू शकतो. यामुळे पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया चांगली असल्यास बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल असे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात.

हिवाळी हंगामात बाजरी खाणं शरीराला फायदेशीर ठरतं.

बाजरीची खिचडीही शरीरासाठी खूप चांगली असते.

बाजरीमध्ये डायट्री फायबर असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

बाजरीत फायबर असल्याने डायबिटीज असणाऱ्यांना रूग्णांसाठीही ते फायदेशीर असते.

बाजरीत असलेलं लोह रक्त वाढवण्यासाठी मदत करते.