ऐकलंत का? क्रिती सेनॉनने दिली होती करण जोहरच्या चित्रपटासाठी ऑडिशन, पण...

मुंबई तक

करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो सध्या बराच चर्चेत आहे. या शो मध्ये येणाऱ्या बॉलिवूड कलाकार त्यांच्याबद्दलचे खुलासे करत आहेत.

अलिकडेच विक्की, कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी आणि शाहिद कपूर यांनी या शोमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या.

आता या शोमध्ये क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफने हजेरी लावलीये. या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

क्रिती सेनॉनला या करण जोहरने प्रश्न विचारला की, कधी तुला चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलंय का? या प्रश्नाला उत्तर देताना क्रिती सेनॉनने खुलासा केला.

मी करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअर सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं, पण तिची निवड झाली नाही, असं क्रिती सेनॉन म्हणाली.

करण जोहरचा स्टुडंट ऑफ द इअर सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे मुख्य भूमिकेत होते.

याच सिनेमाचा सिक्वेल २०१९ मध्ये आला. या सिनेमात टायगर आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत होते.

कॉफी विद करणच्या ७व्या सीझनमध्ये आतापर्यंत रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार, आमिर खान, करीना कपूर, विक्की कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी सह अनेक कलाकार आले आहेत.

kriti sanon instagram