मुंबई तक
कोल्हापूरच्या युवराज शेलेंनी क्रांतीकारी पाऊल टाकतं वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह करून दिला.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे रत्ना शेले यांच्या सख्ख्या बहिणी आणि भाऊ अशा तब्बल सहा जणांचा निधन झालं.
त्यापाठोपाठ पतीचं अपघाती निधन झालं. यानंतर हतबल झालेल्या रत्ना यांना सावरण्यासाठी आईचा दुसरा विवाह करून देण्याचा मुलांनी चंग बांधला.
कुंकू नसलेलं कपाळ आणि बांगडयाविना सुने सुने दिसणारे आईचे हात युवराजच्या मनाला अगणित वेदना द्यायचे.
शेवटी खूप विचार करून, युवराजनं आपल्या आईचा पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
हा निर्णय ऐकल्यावर समाज काय म्हणेल? असा विचार करुन आईनं पुनर्विवाहाला स्पष्ट नकार दिला. मात्र युवराज आपल्या निर्णयावर ठाम होता.