मुंबई तक
इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी सध्या आजारी आहे.
ललित मोदीला कोरोनानंतर, इंफ्लुएंजा आणि निमोनिया या आजारांनी जखडलं आहे.
उपचारासाठी ललित मोदी मेक्सिकोहून एअर अॅम्ब्युलन्सने लंडनला पोहोचला आहे.
अशा स्थितीत, कोट्यवधींचे मालक असणाऱ्या ललित मोदीने, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठा निर्णय घेतला आहे.
ललित मोदीने त्याचा मुलगा रूचिर मोदीची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
रूचिर मोदी आता जवळजवळ 4500 कोटींची संपत्ती सांभाळेल.
ललित मोदीने KK Modi फॅमिली ट्रस्टची संपत्ती रूचिर मोदी सांभाळणार असल्याची घोषणा केली आहे.
याआधी केके मोदी ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये रूचिर मोदीने महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
ललित मोदीने मुलगी आलियासोबत चर्चा केल्यानंतरच, या मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे.
आलिया मोदी लग्नानंतर लंडनला स्थायिक झाली. लंडनमधील इंटीरियर डिझाइन कन्सल्टेंसीची ती सीईओ आहे.