नवीन वर्षाच्यापूर्वी LIC ने दिला झटका; गृहकर्ज केला महाग

मुंबई तक

2022 वर्ष जाताजाता देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

LIC मधून गृहकर्ज घेणे आता महाग झाले आहे. कारण LIC हाउसिंग फायनान्स (LIC HFL) ने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

या निर्णयामुळं ग्राहकांवरील हफ्त्यांचं ओझं वाढणार आहे.

कंपनीकडून व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्के वाढ करण्यात आली आहे.

व्याजदरात ताज्या वाढीनंतर गृहकर्जाचा किमान व्याजदर 8.65 टक्के झाला आहे. हे नवीन दर 26 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

अलीकडेच आरबीआयने रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर अनेक बँकांनी त्यांची कर्जे महाग केली होती. आता या यादीत एलआयसी हाउसिंग फायनान्सचेही नाव जोडले गेले आहे.

LIC चे सीईओ म्हणाले बाजार पाहता त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. जागतिक उलथापालथी होऊनही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहता लोकांची घरे खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे.