Billionaires List: टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून अंबानी बाहेर, अदानींचं स्थानही घसरलं

मुंबई तक

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे.

कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे भारतीय अब्जाधीश उद्योजकांना मोठा फटका बसला.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे.

उद्योजकांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे गौतम अदानी तिसऱ्यावरून चौथ्या क्रमांकावर आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत.

मुकेश अंबानींचा अब्जाधीशांच्या यादीत 12वा क्रमांक आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत असणारे गौतम अदानी हे बर्‍याच काळापासून टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते.

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी बऱ्याच काळापासून टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 8व्या क्रमांकावर होते.

मात्र, मुकेश अंबानी आता 12व्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर आहेत.