Maera Mishra : मॉडेलच्या फोटोमुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा वादात

मुंबई तक

कधी छत्रपती शिवाजी महाराज, कधी सावित्रीबाई फुले, तर मुंबई...आपल्या वक्तव्यामुळं नेहमी वादात सापडणारे राज्यपाल कोश्यारी...आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसताहेत...

याचं कारण आहे एक मॉडेल...तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत... त्यावरून राज्यपालांवर टीकाही केली जातेय.

मायरा मिश्रा नावाच्या एका मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या 11 व्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर मायरा मिश्रा चर्चेत आली.

उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेल्या मायरानं छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अशोका, उडाण, बहू बेगम आणि भंवर सारख्या टीव्ही मालिकांमध्ये तीनं भूमिका साकारल्या.

आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली, ती राजभवनातल्या व्हायरल फोटोमुळे... तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला होता. राजभवन असं लोकेशनही या फोटोवर दिसतं.

तिनं राजभवनावर राज्यपालांच्या खुर्चीसोबत हा फोटो काढलाय. त्यावरून सध्या राज्यपालांवर टीका होतेय. यावर मनसेनंही आक्षेप घेतला.

मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय, 'ठिकाण राजभवन... ही बाई कोण ? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?'