Mahavikas Aaghadi महामोर्चामध्ये लक्षवेधी पोस्टर्स; पाहा फोटो

मुंबई तक

शनिवारी मुंबईच्या रस्त्यांवर महाविकास आघाडीचा राज्यव्यापी महामोर्चा मोठ्या गर्दीत निघाला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प अशा काही कारणांचा निषेध म्हणूनही हा मोर्चा काढण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही विधानं, भाजप नेत्यांची काही वक्तव्य याचा निषेध म्हणून या महामोर्चा काढण्यात आला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही या महामोर्चामध्ये निषेध करण्यात आला.

या महामोर्चामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

ईडी सरकार म्हणून शिंदे-फडणवीस आणि केंद्र सरकारवर या महामोर्चात टीका करण्यात आली.

केंद्र सरकारवर महामोर्चामधून मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आलं.

50 खोके एकदम ओके या सुप्रसिद्ध घोषणेचेही फलक या मोर्चात पाहायला मिळाले.