कॉर्न फ्लेक्सपासून बनवा पौष्टिक चटपटीत चिवडा, सोपी आहे रेसिपी

मुंबई तक

नाश्ता पौष्टिक, हलका असावा म्हणून काहीजण दूध आणि कॉर्न फ्लेक्स खातात.

कॉर्न फ्लेक्स मक्यापासून बनवण्यात येतं. ते शरीरासाठी पौष्टिक असतं.

कॉर्न फ्लेक्स दूधासोबत खायचं नसेल, तर त्याचा चिवडा बनवूनही खाता येतं.

कॉर्न फ्लेक्सला कसं चटकदार बनवावं याची खास रेसिपी जाणून घेऊयात.

सर्वात आधी 2 कप कॉर्न फ्लेक्स, 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा मोहरी, 1 कापलेली हिरवी मिरची घ्या.

नंतर 1 चमचा बडीशेप, कढीपत्त्याची पानं, 2 चमचे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घ्या.

1 चमचा भाजलेली चणा डाळ, चवीनुसार हळद, मिरची पावडर आणि साखर, 1 चमचा मसाला घ्या.

गॅस चालू करून तव्यात तेल गरम करा. त्यात मोहरी टाकून हिरवी मिरची, बडीशेप आणि कडीपत्ता टाका.

एक मिनिटानंतर शेंगदाणे टाकून 2-3 मिनिटं तळून घ्या. त्यामध्ये भाजलेली चणाडाळ टाका.

हळद, मिरची पावडर टाकून त्यात कॉर्न फ्लेक्स चांगलं भाजून घ्या.

यानंतर चाट मसाला, चवीनुसार साखर, मीठ टाका आणि गॅस बंद करा. चटकदार कॉर्नफ्लेक्स चिवडा तयार होईल.