मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे ब्रेकअप झाले?, चाहते म्हणाले...

मुंबई तक

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लव्ह बर्ड्स नेहमीच चर्चेत असते. दोघांचा रोमान्स, त्यांची सिझलिंग केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.

सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी दोघे कधीही सोडत नाहीत.

मात्र सध्या या जोडप्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी गडबड असल्याचा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.

मलायका आणि अर्जुन दोघेही जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांचा हात हातात घेताना दिसतो. ते विमानतळावर पापाराझींसाठी हातात हात घालून दिसत असतात.

मात्र, यावेळी दोघेही एकमेकांपासून दूर कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसले आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुन दोघेही एकमेकांपासून दूर राहताना दिसत आहेत. दोघांचाही मूड खराब असल्याचे दिसत आहे.

दोघांच्या चेहऱ्यावरचा हा तणाव पाहून दोघांमध्ये भांडण झाले असावे, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, कदाचित दोघांमध्ये भांडण झाले असावे. आता मलायका आणि अर्जुनमध्ये नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही.