Malaika Arora Photos: अर्जुन कपूरला सोडून कोणासोबत डिनर डेटवरती गेली मलायका?

मुंबई तक

मलायका अरोरा रात्री उशिरा मित्रांसोबत डिनर केल्यानंतर मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान अर्जुन कपूर तिच्यासोबत दिसला नाही.

अशा परिस्थितीत चाहते अर्जुन कपूरला खूप मिस करत आहेत. त्याचबरोबर मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

मलायका अरोरा ही बी टाऊनच्या स्टार पार्ट्यांची जान मानली जाते. प्रत्येक पार्टीतील मलायका अरोराच्या लुक आणि फोटोंचीचाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता पुन्हा एकदा मलायकाचा लेटेस्ट लुक सोशल मीडियावर समोर आला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायकाच्या लुकची खूप चर्चा होत आहे. यादरम्यान अभिनेत्री कॅज्युअल लुकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती.

मलायकाने पांढरा स्ट्रॅपी टॉप घातला होता त्याखाली तिने डेनिम जीन्स घातली होती. यासोबतच पांढऱ्या रंगाचे शूज आणि स्लिंगबॅगने तिच्या लुकमध्ये भर घालत होती.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे, त्याचबरोबर ती खूपच फिट दिसत आहे. तिचे हे कृत्य पाहून मलायका 48 वर्षांचीआहे याचा अंदाज लावता येत नाही.

अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मात्र, या वृत्तावर अद्याप दोघांनीहीकोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.