अभिनेत्याने रात्री ३ वाजता बोलावलं तरी जावं लागेल, नाहीतर...; मल्लिका शेरावत काय म्हणाली?

मुंबई तक

बोल्ड, ब्युटीफुळ आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने चित्रपटसृष्टीबद्दल खळबळजनक विधान केलं आहे.

चित्रपटामध्ये बोल्ड सीन दिल्यामुळ चर्चेत राहिलेली मल्लिका शेरावत सडेतोड भूमिका मांडताना दिसते.

मल्लिका शेरावतने आपल्या नव्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीबद्दल काही विधानं केली आहेत. कास्टिंग काऊचबद्दल तिने सांगितलं.

मल्लिका शेरावत म्हणाली, "सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला. कारण मी तडजोड करत नव्हते."

"त्यांना तशाच अभिनेत्री आवडायच्या, ज्यांना ते कंट्रोल करू शकत होते आणि त्यांच्यासोबत ज्या अभिनेत्री तडजोड करायच्या. मी अशी नाहीये. माझं व्यक्तिमत्व अशा स्वरूपाचं नाही."

"मी स्वतःला इतरांच्या इच्छेप्रमाणे नाही वागवू शकत. तुम्ही चित्रपट करत आहात आणि हिरोने तुम्हाला रात्री ३ वाजता फोन करून घरी बोलावलं, तर तुम्हाला जाव लागेल. जर तुम्ही गेला नाहीत, तर समजून जा की चित्रपटातून काढलं," मल्लिका शेरावत म्हणाली.

मल्लिका शेरावतने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला होता.

मल्लिकाने अशी भूमिका मांडली होती की, तिने जसे बोल्ड आणि इंटिमेट सीन्स २००४ मध्ये दिले होते.

तसे सीन्स आता दीपिका पदुकोणने दिले आहेत आणि त्यासाठी तिचं कौतुक होतंय. पण जेव्हा मल्लिकाने असे सीन्स दिले, तेव्हा तिच्याबद्दल वाईट बोललं गेलं, असं मल्लिका शेरावत म्हणाली होती.

मल्लिका शेरावत फोटो इन्स्टाग्राम