Cricket : ग्लॅमरस होस्ट मंदिरा बेदी IPL मध्ये दिसणार!

मुंबई तक

क्रिकेटच्या मैदानावर ग्लॅमरचा तडका देणारी अभिनेत्री मंदिरा बेदी आता पुन्हा एकदा मैदानावर परतणार आहे.

आयपीएलची फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्स आणि कलर्स वाहिनी एक नवा क्रिकेट रियलिटी शो लाँच करणार आहे.

हाच शो प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटर मंदिरा बेदी होस्ट करणार आहे.

'क्रिकेट का तिकीट' असं या शोचं नाव आहे.

या शो द्वारे देशभरातील गुणवान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

मंदिरा बेदी ही क्रिकेट जगतात क्रिकेट प्रेझेंटरचा ट्रेंड सुरू करणाऱ्यांपैकी एक मॉडेल म्हणून ओळखली जाते.