विकी-कतरिनाला जिवे मारण्याची धमकी देणारा निघाला स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर

मुंबई तक

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफला धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अखेर गजाआड झाला.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ज्याला अटक केलीये, त्या आरोपीचं नाव आहे मनविंदर सिंग.

२५ वर्षीय मनविंदर सिंग स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर असून, तो कतरिना कैफचा मोठा चाहता आहे.

सांताक्रूझ पोलीस ठाण्यात विकी कौशलने तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

मनविंदर सिंगला कतरिना कैफसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे तो कतरिना कैफसोबत फोटो आणि व्हिडीओ एडीट करून इन्स्टाग्रामवर शेअर करायचा.

गेल्या काही महिन्यांपासून त्याने हद्दच पार केली. मनविंदर सिंग कतरिना कैफचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठलाग करायचा. तसेच कतरिना कैफला धमक्या द्यायला लागला.

मनविंदर सिंगने नंतर नंतर कतरिना कैफ आणि विकी कौशलला जिवे मारण्याच्या धमक्या द्यायला सुरू केलं. मनविंदर सिंगच्या सततच्या धमक्यानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे याची तक्रार केली.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि ५०६ २ आणि ३५४ ड नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंगला मालाड येथून अटक केली आणि त्यानंतर वांद्रे न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कतरिना कैफ विकी कौशल फोटो इन्स्टाग्राम