मुंबईतील प्रसिद्ध 'अविघ्न' पार्कवर पुन्हा 'विघ्न', लागली भीषण आग

मुंबई तक

मुंबईतील परळ भागातील अविघ्न पार्क या प्रसिद्ध बहुमजली इमारतीला आज (15 डिसेंबर) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या 64 मजली इमारतीच्या 22 व्या मजल्यावर ही आग लागली आहे.

वन अविघ्न पार्क इमारतीला सकाळी 11 च्या सुमारास आग लागली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या किमान पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ऑक्टोबर 2021 मध्येही याच निवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग लागली होती ज्यामध्ये 30 वर्षीय सुरक्षा रक्षक लोकांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात स्वत: मरण पावला होता.