Miss Universe हरनाज संधूचं एवढं वजन कसं वाढलं? झाली ट्रोल

मुंबई तक

मिस युनिव्हर्स 2022 चे आयोजन 15 जानेवारी 2023 ला करण्यात आलं होतं.

अमेरिकेची बॉनी गेब्रिएल या स्पर्धेची विजेती ठरली.

भारतीय मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूनेही यावेळी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

चंदीगडच्या हरनाज संधूने 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.

मिस युनिव्हर्स 2022 कार्यक्रमात हरनाजने स्टेजवर रॅम्प वॉक केला. पण, यानंतर जे घडलं ते काही वेगळंच...

रॅम्प वॉकनंतर हरनाजला सोशल मीडियावर वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं.

हरनाजला सीलिएक नावाचा एक आजार आहे ज्यामुळे तिचे वजन वाढते.

हरनाज मिस युनिव्हर्स स्पर्धेची तयारी करत होती त्यावेळी तिने फिटनेसवर लक्ष केंद्रित केले होते.

हरनाज सांगते, 'मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर 1 महिना फिटनेसवर लक्ष दिलं नाही, यामुळे वजन वाढू लागलं.'