मुंबई तक
नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
शुभांगी पाटील यांच्या रुपाने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यापुढे कडवं आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या मूळच्या राष्ट्रवादीच्या आहेत.
राष्ट्रवादीसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन केली.
२१ सप्टेंबर २०२२ रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शुभांगी पाटील यांनी अपक्ष अर्ज भरुन महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला आहे.