राज ठाकरे प्रचंड संतापले... सिंधुदुर्गात असं काय घडलं?

मुंबई तक

सिंधुदुर्ग मधील मनसे पदाधिकाऱ्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड नाराज झाले आहेत.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथे पदाधिकाऱ्यांकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. पण तिचे नियोजन प्रचंड ढिसाळ असल्याने राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्गमधील मनसेत असणारी गटबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

सिंधुदुर्गमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून इतर कार्यकर्त्यांना बैठकीबद्दल निरोपच पोहचले नाहीत.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

बैठकीच्या ढिसाळ नियोजनामुळे राज ठाकरे हे प्रचंड संतापले. यावेळी नाराज राज ठाकरेंनी बैठकीला न जाणंच पसंत केलं.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई यांनीच कणकवलीमध्ये आटोपशीर बैठक घेतली.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray

या बैठकीनंतर राज ठाकरेंनी सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणीच बरखास्त करण्याचे आदेश दिले.

फोटो सौजन्य: insta/raj_shrikant_thackeray