मोहम्मद शमीचं आयुष्य राहिलंय खडतर, पत्नीसोबत अन् संसारही मोडला

मुंबई तक

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात एकाच षटकात तीन गडी बाद करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

मोहम्मद शमी त्यांच्या कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत येतो. शमीचं आयुष्यही तसंच चर्चेत राहिलंय.

मोहम्मद शमीचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे. शमीचा पत्नी हसीन जहा सोबतही वाद सुरू आहे.

मोहम्मद शमीनं आयपीएल चिअर लीडर हसीन जहासोबत कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार नीट झाला नाही.

मोहम्मद शमी आज यशाच्या ज्या उंचीवर पोहोचलाय, त्याच सर्व श्रेय तो वडील आणि भावाला देतो.

मोहम्मद शमीचे वडील तौसीफ शमी यांचं ६ वर्षांपूर्वी निधन झालंय.

२०१८ मध्ये हसीन जहाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावावर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि कौटुंबिक हिंसेचा आरोप केला होता.

हसीन जहाने व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले होते आणि मोहम्मद शमीवर दुसऱ्या मुलींसोबत चॅटिंग करत असल्याचा आरोप केला होता.

कुटुंब दुभंगल्यानंतरही मोहम्मद शमीनं स्वतःला खंबीर ठेवत कामगिरीतील सातत्य कायम ठेवलं.