Mood of the Nation : भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?

मुंबई तक

इंडिया टूडे-C वोटरच्या सर्व्हेनुसार योगी आदित्यनाथ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांना 39 टक्के लोकांनी पसंती दर्शविली.

अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली

तमिळनाडूचे मुख्यमंत्री M. K. स्टॅलिन चौथ्या क्रमांकावर असून 5 टक्के लोकांनी पसंती दिली

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या क्रमांकावर असून त्यांना 3 टक्के लोकांनी पसंती दर्शविली.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा सहाव्या क्रमांकावर असून त्यांनाही 3 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.

2.4 टक्के पसंतीसह शिवराज सिंह चौहान सातव्या क्रमाकांवर आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.