मौनी रॉयचा रोमान्स; 'लिप टू लिप किस' करत सुरज नांबियारला केलं विश

मुंबई तक

छोटा पडदा गाजवल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या बरीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मौनी रॉय सातत्याने फोटो शेअर करत असते.

मौनी रॉयने नव्याने काही फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉयने शेअर केलेल्या या फोटोंची खुपच चर्चा होत आहे. कारण या फोटोंमध्ये मौनी रॉयने सुरज नांबियारला खास पद्धतीने विश केलं आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने दुबईस्थित उद्योगजक सुरज नांबियारशी संसार थाटला आहे. मौनीने सुरज नांबियारच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले असून, त्यात ती फारच रोमँटिक झालेली दिसत आहे.

मौनी रॉयने अनेक फोटो शेअर केले असून, त्यात ती पती सुरज नांबियारसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

मौनी रॉयने फोटो शेअर करत, पती सुरज नांबियारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिचा रोमँटिक अंदाज पाहून चाहतेही कमेंट करत आहेत.

मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सुरज नांबियारला लिप टू लिप किस करताना दिसत आहे.

मौनी रॉयने पती सुरज नांबियारसोबत वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशन केलं. यात दोघेही एका बोटीवर दिसत आहेत.

एका फोटोमध्ये सुरज नांबियारही मौनी रॉयला किस करताना दिसत आहे.

सुरज नांबियारच्या वाढदिवसानिमित्त मौनी रॉयने व्हाईट ड्रेस परिधान केलेला होता. त्यावर ती खूपच सुंदर दिसत होती.

छोट्या पडद्यावर छाप सोडल्यानंतर मौनी रॉयने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्रमध्ये मौनी रॉयने भूमिका साकारलेली आहे.

बिग बजेट सिनेमात मौनी रॉय खलनायिकेच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

मौनी रॉयच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची तिच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

फोटो- मौनी रॉय इन्स्टाग्राम