अभिनेत्री मृणाल ठाकूरला कॉलेजमधून काढून टाकलं होतं

मुंबई तक

छोट्या पडद्यावरून अभिनयाला सुरूवात केलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीये.

मृणाल ठाकूरने मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. अलिकडेच ती शाहिद कपूरच्या जर्सी चित्रपटामध्ये दिसली होती.

मृणाल ठाकूरने सुपर ३० आणि बाटला हाऊस या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

मृणाल ठाकूरला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. एका मुलाखतीत तिने हा किस्सा सांगितला होता. मृणाल ठाकूरची हजेरी खूप कमी होती आणि त्यामुळे तिला काढून टाकण्यात आलं होतं.

मृणाल ठाकूर महाराष्ट्रीय आहे. मृणाल ठाकूर मुळची धुळे जिल्ह्याची रहिवाशी आहे. मृणाल ठाकूरला खानदेशी भाषाही चांगली बोलता येते.

मृणाल ठाकूरने हिट ठरलेल्या दी मॅट्रिक्स या हॉलिवूड चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मृणाल ठाकूरने ज्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, ती भूमिका प्रियांका चोप्राला मिळाली.

अभिनेत्री मृणाल ठाकूरला वैद्यकीय शास्त्र हा विषय आवडीचा होता. तिने डेंटिस्ट व्हावं, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.

डेंटिस्ट होण्यासाठी मृणाल ठाकूरने परीक्षा सुद्धा दिली होती. अभिनयाच्या वेडामुळे तिने डेंटिस्ट होण्याचं स्वप्न बाजूला सारलं आणि अभिनयाकडे वळली.

मृणाल ठाकूरची मोठी बहीण लोचन ठाकूर हेअर आणि मेकअप आर्टिस्ट आहे.

मृणाल ठाकूर फोटो इन्स्टाग्राम