मुंबई तक
मुंबई व नवी मुंबईला जोडण्यासाठी देशातील सर्वात लांब 22 किमीच्या सागरी सेतूची उभारणी सध्या सुरू आहे.
एमएमआरडीएमार्फत प्रगतीपथावर असलेल्या या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम पूर्णत्वास आलं आहे.
समुद्रात बांधण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकच्या उभारणीचे काम मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत पार पडलं
या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची 180 मीटर लांबी तर समुद्रापासून 25 मीटर इतकी उंची आहे.
या संपूर्ण प्रकल्पामध्ये 65 मीटर ते 180 मीटर लांबीचे 70 ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी करण्यात येते आहे.
ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकमध्ये 70 पैकी 36 डेकचे काम पूर्ण झालं आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक उभारण्याचा हा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
संपूर्ण प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी 5.5 किमी इतकी आहे
याच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई खाडी आणि शिवाजीनगर इंटरचेंजमध्ये 7.8 किमीच्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.