Nalasopara : एलईडी लाईट बनवणाऱ्या कारखान्यात भयंकर दुर्घटना!

मुंबई तक

नालासोपाऱ्यातील पेलहार फाटा येथे एलईडी लाईट बनवणाऱ्या कारखान्यात वाईट घटना घडली.

वाकणपाडा परिसरात रामा इंडस्ट्रीमध्ये एलईडी लाइट बनवणारा कारखाना आहे.

बुधवारी (25 जानेवारी) कंपनीत शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.

स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

काही तास प्रयत्न केल्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं.

इलेक्ट्रॉनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे वाकणपाडा परिसरात खळबळ उडाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.

याठिकाणी अग्निशमन दल, पेलहार पोलीस पथक हजर होते.