Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी दुर्घटना; २९ भाविकांची बस उलटली

मुंबई तक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी दुपारी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटून मोठा अपघात झाला.

या बसमध्ये २९ प्रवासी असल्याची माहिती आहे. त्यापैकी १३ जण जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडात अडकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात