Jindal fire : नाशकात भयंकर अग्नितांडव, आभाळापर्यंत धुराचे लोळ

मुंबई तक

नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी नाशिक जिल्ह्यात भीषण अग्नितांडवाची घटना घडली.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नजिक असलेल्या मुंढेगाजवळ जिंदाल कंपनी स्फोट होऊ ही दुर्घटना घडली.

जिंदाल समूहाच्या या कंपनीत पोलिफिल्मची निर्मिती केली जाते. काम सुरु असतानाच हा स्फोट झाला.

आधी स्फोट झाला आणि नंतर आगीचा भडका उडाला. आग इतकी भीषण होती की धूराचे लोट आभाळापर्यंत पोहोचले.

आगीच्या या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून, 14 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं.