Nawazuddin Siddiqui : लाल साडी, कानात झुमके अन्..., नवाजुद्दीनचे दिलखेच अंदाज

मुंबई तक

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी चित्रपटातील लुक बघून चाहतेही विचारात पडलेत.

अभिनयाने सिनेरसिकांची दाद मिळवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा ट्रान्सजेंडर लुक बघून सगळेच फिदा झालेत.

हड्डी चित्रपटातील लुकचा फोटो नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केलाय.

'गिरफ़्तार तेरी आँखो में हुवे जा रहे हैं हम, जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम,' असा शेरही नवाजुद्दीनने शेअर केलाय.

नवाजुद्दीनचा हा लुक बघून चाहते स्तुती करताहेत. कोणत्याही भूमिकेचं नवाजुद्दीन सोनं करतो असं नेटकरी म्हणताहेत.