मुंबई तक
सध्या बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
नवाजुद्दीन व्यावसायिक जीवनापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे.
पत्नी आलियासोबतच्या वादामुळे नवाजुद्दीनच्या अडचणीत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.
अशातच नवाजुद्दीनला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
पत्नीसोबत वाद सुरू असताना, नवाजुद्दीनच्या आईची प्रकृती खालावली आहे.
काल (2 मार्च) रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी वर्सोवा येथील बंगल्यावर आईला भेटायला गेला. पण, सख्ख्या भावाने त्याला बाहेरच रोखलं.
नवाज आणि त्याची एक्स पत्नी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे भाऊ फैजुद्दीन याने त्याला गेटवरचं थांबवलं आणि भेटू दिलं नाही.
शेवटी आईला न भेटताच नवाजुद्दीनला परतावं लागलं. ज्याचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे.