नेहा शर्मा स्वतःला कशी ठेवते फीट?, डाएटमध्ये घेते रेड वाईन

मुंबई तक

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

नेहा शर्मा सिनेसृष्टीतील फीट असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

नेहा शर्माने करिअरची सुरूवात २००७ मध्ये केली. नेहाने तेलगू चित्रपट चिरुथामध्ये भूमिका साकारली होती.

त्यानंतर नेहा शर्माने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भूमिका केल्या.

नेहा शर्मा तिच्या बोल्ड लुकमुळेही प्रसिद्ध आहे. नेहा शर्मा फीट राहण्यासाठी दररोज जिमला जाते.

नेहा शर्मा सोशल नेहमीच सक्रिय असते. ती जिममधील वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असते.

नेहा शर्मा दररोज ४ ते ५ दिवस वेट ट्रेनिंग करते.

नेहा शर्मा कार्डिओ एक्सरसाईजही करते, ज्यामुळे फॅट बर्न करण्यास मदत होते.

नेहा शर्मा शर्मा आठवड्यातून १ किंवा २ दिवस हाय इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंगही करते.

नेहा शर्मा दररोज योगा करते. ज्यामुळे तिला मानसिकरित्या स्वस्थ राहण्यास मदत होते.

नेहा शर्मा एरोबिक एक्सरसाईजही करते.

नेहा शर्मा ब्रेकफास्टमध्ये १ फळ, २ अंडी किंवा ओट्स, ऑरेंज ज्यूस घेते.

लंचमध्ये हिरव्या पालेभाज्या आणि चिकन किंवा डाळ यांचं सेवन करते.

नेहा शर्मा सायंकाळी ग्रीन टी घेते आणि सँडविच खाते. तसंच डिनरमध्ये सलाड, चपाती, डाळ किंवा मासे यांचं सेवन करते.

नेहा शर्मा फोटो/इन्स्टाग्राम