'बेशरम रंग' गाण्यामुळेच नाही तर 'या' कारणांमुळेही दीपिका पदुकोण अडकली आहे वादात

मुंबई तक

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बेशरम रंग या गाण्यामुळे चर्चेत आहे, तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं आहे.

सर्व फोटो सौजन्य-दीपिका पदुकोण, इंस्टाग्राम

बेशरम रंग या गाण्यातल्या डान्स स्टेप्समुळे तिला ट्रोल केलं जातं आहे, मात्र वादात अडकण्याची दीपिकाची ही पहिली वेळ नाही

पठाण सिनेमातलं पहिलं गाणं रिलिज झाल्यानंतर दीपिकावर टीकेची झोड उठली आहे

दीपिकाच्या पद्मावत या सिनेमावरूनही बराच वाद झाला, या सिनेमाचं नाव पद्मावती ठेवण्यात आल्याने करणी सेनेने आक्षेप घेतला होता

रामलीला या सिनेमातल्या काही दृश्यांमुळेही वाद निर्माण झाला होता

आता पठाण सिनेमातल्या गाण्यात तिने भगवी बिकिनी घातल्यावरूनही तिला ट्रोल केलं जातं आहे

छपाक सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान दीपिका जेएनयूमध्ये गेली होती त्यावरूनही बराच वाद झाला होता

दीपिका गहराईयाँ सिनेमातील बोल्ड दृश्यांमुळेही ट्रोल झाली होती

वाद आणि दीपिका यांचं नातं नवं नाही तर आधीपासूनच आहे हे दिसून येतं