इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत नारी शक्तीच दर्शन

मुंबई तक

आज दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे.

त्यानिमित्त भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या नारीशक्तीचं दर्शन घडलं.

आज भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या.

महिला भारत यात्री, काँग्रेसच्या महिला खासदार, महिला आमदार, महिला पंचायत समिती सदस्य, महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या राहुल गांधींसोबत चालत आहेत.

या महिला आज दिवसभर राहुल गांधींसोबत चालणार असून त्यांच्याशी चर्चाही करणार आहेत.

भारत जोडो यात्रा आता बुलढाणा जिल्ह्यातून पुढे वाढत शेगावहून जळगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.  

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अंतिम टप्पा सुरु झाला आहे.