मुंबई तक
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 1 येथे स्वीफ्ट कारचा भीषण अपघात झाला.
सोलापूर - पुणे या लेनवर डाळज नंबर 1 गावाच्या हद्दीत चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं.
पुण्याच्या दिशेने येणारी ही कार भिगवणजवळ पलटी झाली. यात कार चालकासह 3 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.
संदीप राजाभाऊ माळी वय 35 वर्षे, बालाजी केरबा तिडके वय 48 वर्षे आणि श्रीमती सरस्वती राजाभाऊ माळी वय 61 वर्षे अशी मृतांची नांवं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पहाटेच्या वेळी हा प्रकार घडला.
कारमधील माय-लेकरांसह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला तर, चंद्रकांत रामकिशन गवळी (वय 54) किरकोळ जखमी झाले.