मुंबई तक
करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला वर्कप्लेसवर फोकस ठेऊन काम करावं लागेल.
त्यासाठी झोप पूर्ण होणं गरजेची आहे. अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने आपण सुस्त होऊन जातो.
अनेकदा दिवसभर घडलेल्या गोष्टींचा रात्री झोपताना आपण विचार करतो. त्यामुळे झोप उडते.
झोप न झाल्याने तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे याचा परिणाम कामावर होऊ शकतो.
यापासून वाचण्यासाठी रात्री येणारे विचार तुमच्या डायरीत लिहण्यासावी सवय लावा
मेडिटेशन केल्याने तुमचा मेंदू शांत राहतो. मेडिटेशनने तुम्हाला झोप चांगली लागते. झोपण्यापूर्वी मेडिटेशन नक्की करा.
अनेकदा झोपताना मोबाईल वापरायची सवय आहे. चांगली झोप पाहिजे असेल तर झोपताना मोबाईल लांब ठेवा
झोप यावी म्हणून फोर्स करू नका. ही एक नैसर्गिक पद्धत आहे.