मुंबई तक
आपल्या शेजारी देश पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
श्रीलंकेत जशी आर्थिक दिवाळखोरी आली, तशीच पाकिस्तानची अवस्था सध्या आहे.
पाकिस्तानचे कर्ज वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
परकीय चलनाचा साठा कमी होत आहे. गेल्या महिन्यात त्यात $294 दशलक्षने घट झाली आहे.
देश सध्या गंभीर परिस्थितीतून जात असल्याचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे.
सरकारी तिजोरी वाचवण्यासाठी शेहबाज शरीफ सरकारने घाईघाईने अनेक पावले उचलली आहेत.
यामध्ये पाकिस्तानमधील विजेचा वापर कमी करून पैसे वाचविण्याचीही शक्कल लढवण्यात आली आहे.
अनेक शहरांमध्ये गॅस उपलब्ध नाही, तर कमर्शिअल सिलेंडर 10,000 पाकिस्तानी रुपयांना विकला जात आहेत.
एवढेच नाही तर आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे सरकार कर्मचाऱ्यांना पगार देण्यासही असमर्थ आहे.
याशिवाय पाकिस्तानी सरकारने बाजार रात्री 8.30 वाजता आणि विवाहगृहं रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय जुलै 2023 पर्यंत इलेक्ट्रिक पंखे आणि बल्बचे उत्पादन बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जेणेकरुन वीज बचत होईल असा पाकिस्तानी सरकारचा कयास आहे.