Dhananjay-Pankaja Munde: भावासाठी पंकजाताई थेट रुग्णालयात...

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे एका अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी स्वत: पंकजा मुंडे रुग्णालयात पोहचल्या.

राजकारणात मुंडे बंधू-भगिनी हे कट्टर वैरी आहेत.

मात्र, जेव्हा प्रसंग दु:खद किंवा अडचणीचा असतो तेव्हा हेच भाऊ-बहीण एकत्र आल्याचं पाहायला मिळतात.

याआधी देखील धनंजय मुंडेंच्या वडीलांच्या निधनावेळी पंकजा मुंडे या अंत्यसंस्काराला पोहचल्या होत्या.

मुंडे कुटुंबातील भावा-बहिणीचं प्रेम हे क्वचितच पाहायला मिळतं.

या भेटीमुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील कटुता नक्कीच काही प्रमाणात कमी झाली असणार.