मुंबई तक
अभिनेता शाहरुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट पठाण रिलीज होण्यापूर्वीच जलवा दाखवत आहे.
चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग वेगाने सुरू आहे.
पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे चाहते अॅडव्हान्स बुकिंग करताना दिसत आहे.
पठाणसाठी चाहत्यांची उत्सुकता वेगळीच आहे. हे त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगवरूनच दिसते.
पठाणचे 20 जानेवारीपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले. तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत.
चाहत्यांचीही महागडी तिकिटं विकत घेण्याची तयारी दिसत आहे.
चित्रपटगृहांमध्ये पठाणची तिकीटं 2400, 2200 आणि 2000 रुपयांना विकली जात आहे.
तिकीट दर इतके महाग असूनही सर्व शो फुल झाले आहेत.