Pathan : "...नाहीतर आम्ही ‘बांबू’ लावू", मनसेचा थिअटर्स मालकांना इशारा

मुंबई तक

अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला.

पठाणमुळे मराठी चित्रपटांवर अन्याय होत असल्याची भूमिका मनसेने घेतलीये.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावरूनच चित्रपटगृहाच्या मालकांना इशारा दिलाय.

"शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित होत आहे."

"बॉलिवूडसाठी मोठी घटना वगैरे आहे, पण शाहरुखचा कमबॅक आहे म्हणून मल्टीप्लेक्सनी 'बांबू' आणि 'पिकोलो' या चित्रपटांचा बळी का द्यावा?"

"पठाणचं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच पाहिजे."

"मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावं, नाहीतर मग आम्ही येऊन 'बांबू' लावूच शकतो", असा इशारा खोपकरांनी दिलाय.