मुंबई तक
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तो कॅन्सरशी झुंज देत होते.
पेले यांनी आपल्या ब्राझील संघासाठी 3 वेळा फिफा विश्वचषक जिंकून दिला आहे.
पेले यांचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत होतं. कारण त्यांनी तीन विवाह केले होते. याशिवाय अनेक मॉडेल्ससोहत त्यांचे अफेअर होते.
पेलेंना तीन पत्नींपासून 7 मुलं झाली होती. या 7 मुलांपैकी 5 मुली आणि दोन मुले आहेत.
पेलेंचा पहिला विवाह Rosemeri dos Reis Cholbi शी झाला होता. पहिल्या पत्नीपासून 3 मुले होती. त्यात दोन मुली आणि एक मुलगा होता.
पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी पेलेचे ब्राझिलियन गायक Xuxa सोबत अफेअर सुरू झाले. त्यामुळे पेले यांचे पहिले लग्नही मोडले. पण हे अफेअर फार काळ टिकले नाही.
पेलेने दुसरं लग्न 1996 मध्ये Assiria Lemos Seixas सोबत केलं होतं. जिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
ब्राझिलियन दिग्गज पेलेने 2016 मध्ये कबूल केले की, त्याने मार्सिया सिबेले अओकीशी तिसरे लग्न केले होते.
या तिसर्या लग्नातूनही पेले दोन मुलांचे वडील झाले. या दोन्ही मुली आहेत.