Laxman Jagtap : नगरसेवक ते आमदार, 'भाऊंचा' ३७ वर्षांचा राजकीय प्रवास

मुंबई तक

चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं.

लक्ष्मण जगताप मागील ३७ वर्षांपासून राजकारणात होते. 

लक्ष्मण जगताप १९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत नगरसेवक होते. 

१९९३ ला लक्ष्मण जगताप स्थायी समिती अध्यक्ष, तर २००२ ला महापौर झाले.

२००४ साली लक्ष्मण जगताप विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर २००९ साली चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

२०१४ साली जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेवर निवडून आले.

२०१४ आणि २०१९ ला जगताप भाजपकडून विजयी झालेले आहेत. 

२०१४ ची लोकसभा निवडणूक जगताप शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.

२०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे.