ऋत्विक भालेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान मोदींचे संध्याकाळी 4.30 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे.
एअर पोर्टच्या गेट क्रमांक 8 मधून पंतप्रधान मोदी बाहेर येतील. याठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होईल.
संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी बीकेसी ग्राउंडवर दाखल होतील.
याठिकाणी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन आणि जाहीर सभा होणार आहे.
यानंतर पंतप्रधान मोदी गुंदवली स्थानकावरुन मेट्रोचा प्रवास करणार आहेत.
गुंदवलीवरुन पुढच्या स्थानकावर उतरुन पंतप्रधान विमानतळसाठी रवाना होतील.