Prajakta Mali : कपाळी चंद्रकोर अन् नाकात मोरणी नथ, भावाच्या लग्नात प्राजक्ताचा थाट

मुंबई तक

'मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माहित नाही माझी होशील का? प्रेम फक्त तुझ्यासाठी. नादखुळा! मला तू खूप आवडतेस', ही प्रतिक्रिया आहे प्राजक्ता माळीच्या फोटोवरील.

प्राजक्ता माळीच्या पारंपरिक रुपाने तिच्या चाहत्यांना भुरळच घातलीये.

प्राजक्ता माळीच्या या नटण्या थटण्याचं कारण होतं तिच्या चुलत भावाचं लग्न.

चुलत भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीनं साडी नेसली होती. महत्त्वाचं म्हणजे साडीवरील दागिने तिने कोल्हापूरवरून आणले.

नऊवारी साडी, नाकात मोरणी नथ, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या सांज शृंगार प्राजक्तानं केला होता.

प्राजक्ता माळीच्या अस्सल महाराष्ट्रीय रुपाने चाहत्यांनाही वेड लावलंय.

प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचं चाहते कौतूक करताना दिसत आहे.

फोटो प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम