पुण्यात अग्नितांडव! दुकानांमधील साहित्याची राखरांगोळी, भीषण दृश्ये

मुंबई तक

पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजारात दुकानांना भीषण आग लागली.

मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अग्निशामक दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या होत्या. काही वेळानंतर आग विझवण्यात यश आलं.

या घटनेमध्ये 8 ते 10 दुकानातील मालाची जळून राखरांगोळी झाली.

या दुकानात इलेक्ट्रिक साहित्य आणि मोटारी होत्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झालं.

आगीचं कारण कळू शकलं नाही, असं अग्निशामक विभागाचे पंकज जगताप यांनी सांगितलं.