मुंबई तक
कर्मचारी कपातीच्या तक्रारीनंतर पुण्याच्या कामगार आयुक्तांनी ई-कॉमर्स कंपनी अमॅझॉनला नोटीस पाठवली आहे.
स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्याचा आरोप कंपनीवर आहे.
या नोटिशीमध्ये अॅमेझॉनला १७ जानेवारी २०२३ रोजी कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्पलॉइज सीनेट यांच्यावतीने अमॅझॉनच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इंडस्ट्रियल डिस्पुट अॅक्टनुसार कोणत्याही कंपनीला सरकराच्या परवानगीशिवाय कर्मचारी कपात करता येत नाही, असा दावा करण्यात आला आहे.
एक वर्षापेक्षा कंपनीत काम करतात त्यांना तीन महिन्यांच्या पूर्वसुचनेशिवाय आणि सरकारच्या परवानगीशिवाय नोकरीवरुन कमी करता येणार नाही.
ही तक्रारदार संस्था आयटी सेक्टरमधल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी काम करते.